google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: उपक्रम “ध्यास” (DHYAAS)-इयत्ता: 2 री ते 8 वी साठी

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

उपक्रम “ध्यास” (DHYAAS)-इयत्ता: 2 री ते 8 वी साठी

पालकांनी आपल्या घरी मुलांसाठी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS)

                            

               पालकांनी आपल्या घरी मुलांसाठी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS)




शीर्षक –

आपल्या  इ. २ री ते ८ वीत असणा-या मुलांचा मुलभूत अध्ययन क्षमतांचा स्तर निश्चिती करणे  व अप्रगत मुलांकरिता करीता उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे.


उदिद्ष्टे 

    १. आपल्या मुलाचा वाचन, गणित, आणि इंग्रजी विषयाच्या मुलभूत क्षमतांचा उच्चतम स्तर ठरविणे.
    २. मुलभूत क्षमता अप्राप्त मुलासाठी उपचारात्मक अध्यापनाचे आयोजन करणे.
    ३. इ. २ री ते ८ वी मधील आपल्या मुलाला मुलभूत क्षमतांमध्ये प्रगत करणे.


उपक्रमाचे टप्पे -

   १. आपल्या इ. २ री ते ८ वी असणा-या मुलाची  मराठी वाचन, गणित, आणि इंग्रजी वाचनाची पायाभूत चाचणी घेणे.
   २. चाचणीच्या संपादणूकीचे विश्लेषण करणे व उपचारात्मक अध्यापनासाठी नियोजन करणे.
    ३. अप्रगत मुलाची निश्चिती करून त्यांचेसाठी उपचारात्मक अध्यापनाचे आयोजन करणे.
    ४. उपचारात्मक अध्यापनानंतर फक्त अप्रगत मुलाचे मध्यावधी मूल्यांकन करणे.
    ५. आपला जो मुलगा अद्याप अप्रगत आहेत त्यांचे करिता पुन्हा संबोध दृढीकरणासाठी उपक्रमाचे आयोजन करणे व अंतिम मूल्यांकन करणे.


चाचणीचे स्वरूप -
    १. स्वतःच्या भाषेत सोप्या वाचनाची चाचणी घेणे (मराठी).
    २. गणितातील मुलभूत संकल्पनांच्या ज्ञान पडताळणीची चाचणी घेणे.
    ३. इंग्रजी वाचनाची चाचणी घेणे.


विषयनिहाय मुलभूत अध्ययन स्तर -
१.      मराठी (वाचन)     
अध्ययन स्तर  
 – प्रारंभिक स्तर
- अक्षर स्तर
- शब्द स्तर
- परिच्छेद वाचन स्तर
- गोष्ट वाचन स्तर

    २. गणिती क्रिया
       – प्रारंभिक स्तर
              - १ ते ९ अंक ओळखता येणे.
       - १० ते ९९ अंक ओळखता येणे.
       - वजाबाकीची क्रिया करणे.
       - भागाकाराची क्रिया करणे.

    ३. इंग्रजी (वाचन)  
       – प्रारंभिक स्तर
             - मोठी अक्षरे (Capital letters)ओळखणे.
       - लहान अक्षरे (Small letters) ओळखणे.
       - शब्द वाचन करणे.
             - वाक्य वाचन करणे.


पायाभूत चाचणी प्रसंगी घ्यावयाची काळजी -
          १. मुलांसाठी वातावरण मोकळे असणे आवश्यक आहे.
         २. पालकांनी मुलांना चाचणीसाठी प्रोत्साहित करावे.
         ३. मुलांना चाचणी नमुन्याची ओळख करून देणे.
         ४. मुलांची चाचणीची भाषा, नमुना संच इ. बाबतच्या नोंदी प्रपत्रात करणे.
         ५. विहित प्रपत्रामध्ये आपल्या मुलाच्या मुद्धेनिहाय क्षमतांच्या उच्चतम स्तराच्या नोंदी घेणे.

उपक्रम अंमलबजावणी :
   
    १.पालकांच्या मदतीने चाचणीचे आयोजन करणे, व आपल्या मुलाचा  अध्ययन स्तर निश्चिती करणे.
    २ .प्राप्त माहितीचे संकलन व विश्लेषण करणे.
    ३.आपला मुलगा प्रगत कि अप्रगत ते ठरवणे
    ४.प्रत्येक्ष उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे .


अ.न. विषय परिपत्रक नाव    लिंक
1. 
पालकांनी आपल्या मुलांसाठी घरी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS) 

   माहितीपत्रक 

GO TO LINK
 2.
पालकांनी “ध्यास” (DHYAAS) उपक्रम चाचणी कशी घ्यावी 
सूचना पत्र  GO TO LINK 
3. 
“ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका (मराठी, इंग्रजी, गणित) 
 प्रश्नपत्रिका -एक      
GO TO LINK 
 4.
“ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका (मराठी, इंग्रजी, गणित)
 प्रश्नपत्रिका -दोन     
GO TO LINK
 5.
“ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका (मराठी, इंग्रजी, गणित) 
 प्रश्नपत्रिका -तीन    
GO TO LINK
6. 
“ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका (मराठी, इंग्रजी, गणित)
प्रश्नपत्रिका -चार 
GO TO LINK 

 टीप : पालकांनी चाचणीसाठी कोणतीही एकच प्रश्नपत्रिका घ्यावी. 
                    

                         निर्मिती
                श्री. भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील
                     माध्यमिक शिक्षक
                रा.य.चव्हाण पो.बे.आश्रमशाळा
               हातेड बु.ता. चोपडा जि.जळगाव



२ टिप्पण्या: