google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: मे 2020

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

गुरुवार, २८ मे, २०२०

नवनीत e- Digest (गाईड ) मोफत मिळावा.

 सुवर्णसंधी✨ सुवर्णसंधी✨ सुवर्णसंधी ✨

                       नवनीत प्रकाशन आपल्या साठी घेऊन आले आहे मोफत e- Digest (गाईड )

           Lockdown मुळे पालकांचे आर्थिक व विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होत आहे, याची दखल घेऊन नवनीत प्रकाशन  इयत्ता: १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले आहे एक  SPECIAL OFFER.

        आजच नवनीत चे TOPScorer app Download करा आणि मिळवा इयत्ता  १० वीच्या सर्व माध्यमांच्या सर्व  विषयांच्या e-Digest (गाईड ) अगदी मोफत.  सर्व धड़े / All Chapter अगदी मोफत. 


                 e-Digest  विनामूल्य आवृत्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी

 १) प्ले स्टोअर वरून नवनीत TOPScorer App डाउनलोड करा.

 २) महाराष्ट्र बोर्ड, मध्यम व इयत्ता १० वी निवडा आणि सुरू ठेवा.

 ३) सर्व विषय निवडा (हिंदी १००) नवनीत e-Digest कोर्स (किंवा इतर कोणताही विशिष्ट ई डाइजेस्ट कोर्स)

 4) "एक प्रोमोकोड" वर क्लिक करा आणि  DIGEST20  हा कोड प्रविष्ट करा आणि आता खरेदीवर क्लिक करा.

                        साइन इन करा आणि शिकण्याचा आनंद घ्या.

शनिवार, २ मे, २०२०

पालकांनी आपल्या घरी मुलांसाठी राबवायचा उपक्रम “ध्यास” (DHYAAS)



    पालकांनी आपल्या घरी मुलांसाठी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS)



शीर्षक –

आपल्या  इ. २ री ते ८ वीत असणा-या मुलांचा मुलभूत अध्ययन क्षमतांचा स्तर निश्चिती करणे  व अप्रगत मुलांकरिता करीता उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे.


उदिद्ष्टे

    १. आपल्या मुलाचा वाचन, गणित, आणि इंग्रजी विषयाच्या मुलभूत क्षमतांचा उच्चतम स्तर ठरविणे.
    २. मुलभूत क्षमता अप्राप्त मुलासाठी उपचारात्मक अध्यापनाचे आयोजन करणे.
    ३. इ. २ री ते ८ वी मधील आपल्या मुलाला मुलभूत क्षमतांमध्ये प्रगत करणे.


उपक्रमाचे टप्पे -

   १. आपल्या इ. २ री ते ८ वी असणा-या मुलाची  मराठी वाचन, गणित, आणि इंग्रजी वाचनाची पायाभूत चाचणी घेणे.
   २. चाचणीच्या संपादणूकीचे विश्लेषण करणे व उपचारात्मक अध्यापनासाठी नियोजन करणे.
    ३. अप्रगत मुलाची निश्चिती करून त्यांचेसाठी उपचारात्मक अध्यापनाचे आयोजन करणे.
    ४. उपचारात्मक अध्यापनानंतर फक्त अप्रगत मुलाचे मध्यावधी मूल्यांकन करणे.
    ५. आपला जो मुलगा अद्याप अप्रगत आहेत त्यांचे करिता पुन्हा संबोध दृढीकरणासाठी उपक्रमाचे आयोजन करणे व अंतिम मूल्यांकन करणे.


चाचणीचे स्वरूप -
    १. स्वतःच्या भाषेत सोप्या वाचनाची चाचणी घेणे (मराठी).
    २. गणितातील मुलभूत संकल्पनांच्या ज्ञान पडताळणीची चाचणी घेणे.
    ३. इंग्रजी वाचनाची चाचणी घेणे.


विषयनिहाय मुलभूत अध्ययन स्तर -
१.      मराठी (वाचन)     
अध्ययन स्तर  
 – प्रारंभिक स्तर
- अक्षर स्तर
- शब्द स्तर
- परिच्छेद वाचन स्तर
- गोष्ट वाचन स्तर

    २. गणिती क्रिया
       – प्रारंभिक स्तर
              - १ ते ९ अंक ओळखता येणे.
       - १० ते ९९ अंक ओळखता येणे.
       - वजाबाकीची क्रिया करणे.
       - भागाकाराची क्रिया करणे.

    ३. इंग्रजी (वाचन)  
       – प्रारंभिक स्तर
             - मोठी अक्षरे (Capital letters)ओळखणे.
       - लहान अक्षरे (Small letters) ओळखणे.
       - शब्द वाचन करणे.
             - वाक्य वाचन करणे.


पायाभूत चाचणी प्रसंगी घ्यावयाची काळजी -
          १. मुलांसाठी वातावरण मोकळे असणे आवश्यक आहे.
         २. पालकांनी मुलांना चाचणीसाठी प्रोत्साहित करावे.
         ३. मुलांना चाचणी नमुन्याची ओळख करून देणे.
         ४. मुलांची चाचणीची भाषा, नमुना संच इ. बाबतच्या नोंदी प्रपत्रात करणे.
         ५. विहित प्रपत्रामध्ये आपल्या मुलाच्या मुद्धेनिहाय क्षमतांच्या उच्चतम स्तराच्या नोंदी घेणे.

उपक्रम अंमलबजावणी :
   
    १.पालकांच्या मदतीने चाचणीचे आयोजन करणे, व आपल्या मुलाचा  अध्ययन स्तर निश्चिती करणे.
    २ .प्राप्त माहितीचे संकलन व विश्लेषण करणे.
    ३.आपला मुलगा प्रगत कि अप्रगत ते ठरवणे
    ४.प्रत्येक्ष उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे .

         
       उपक्रम “ध्यास” (DHYAAS)

➤ पालकांनी आपल्या मुलांसाठी घरी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS) माहितीपत्रक DOWNLOAD लिंक :👉 https://drive.google.com/openid=1v7MfZ1s6xiaNT2K8ObCXfQjuT2qpVW08



➤  पालकांनी “ध्यास” (DHYAAS) उपक्रम चाचणी कशी घ्यावी त्याबाबतचे  सूचना पत्र  DOWNLOAD लिंक :👉 https://drive.google.com/openid=1rpqZ6Rwe6IQr1mCMQPmYsHf_FDeZYoQD


टीप : पालकांनी चाचणीसाठी कोणतीही एकच प्रश्नपत्रिका घ्यावी. 


➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -एक ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/open?id=1xbxUmwRwQ58xVdbMQc-gVEF8ryuL_t2A



➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -दोन  ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/open?id=1A_l2YS-waPRV9-k-s6zesmeO9uTUz-dY


➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -तीन ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/openid=1HLe7nwlJ61z9pzvUS6WuLsY9QldO5-_H


➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -चार ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/open?id=1NW757uiDvd5CLEx0H-HX6qkcubKmPWcm



                          निर्मिती
                श्री. भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील
                     माध्यमिक शिक्षक
                रा.य.चव्हाण पो.बे.आश्रमशाळा
               हातेड बु.ता. चोपडा जि.जळगाव






शुक्रवार, १ मे, २०२०

कल चाचणी निकाल व महा करिअर मित्र


                                          कल चाचणी

                                           महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य बोर्ड शाळांमधील १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'कल चाचणी' या प्रकल्पाची २०१६ पासून सुरुवात केली आहे जेणेकरुन विद्यार्थी करिअरचा सुयोग्य पर्याय निवडू शकतील.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ www.mahacareermitra.in व टेक्निकल हेल्पलाईन हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत.
 या पोर्टल व हेल्पलाईनचा उद्देश दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार १९,००० पेक्षा जास्त कॉलेजेस आणि ८०,००० पेक्षा जास्त शैक्षणिक पर्याय जिल्ह्यानुसार उपलब्ध करून देण्यास मदत करणे आहे.
या व्यतिरिक्त, विद्यार्थी तज्ञांच्या संदेशांसह विविध व्हिडिओ पाहू शकतात आणि आवडीच्या क्षेत्रांशी संबंधित लेख वाचू शकतात. हे व्हिडिओ आणि लेख विद्यार्थ्यांना करिअरचा सुयोग्य पर्याय निवडण्यास मदत करतील.

कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  

महा करिअर मित्र 



सूचना - कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  वरील साईट वर जाऊन आपला एस.एस.सी  परीक्षेचा (10 वी बोर्ड परीक्षेचा ) Seat No. टाकाअहवाल या TABS वर CLICK करा ....आपला मार्च 2020 चा कलचाचणी निकाल (अहवाल ) आपणास पाहता येईल व प्रिंट तसेच DOWNLOAD देखील करता येईल.)



आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे कलनुसार ) व्हिडीओज् लिंक :👀 👉
https://www.mahacareermitra.in/#/videos

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे लेख  लिंक👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  शिष्यवृत्ती लिंक 👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  वेबसाईट लिंक 👀👉

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  मार्गदर्शन केंद्र यादी  👀👉


शाळेसाठी  -  शाळा login  👀👉