google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: आदरणीय पालकबंधूनो आपल्यासाठी महत्वाची सुचना

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

शुक्रवार, २६ जून, २०२०

आदरणीय पालकबंधूनो आपल्यासाठी महत्वाची सुचना

*पालकांनो आपल्यासाठी महत्वाची सुचना*

सर्व पालकांना कळवण्यात येते की, जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात इ. १०,१२ चे निकाल लागण्याची शक्यता आहे. (COVID 19) अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास यापूर्वीच खुप उशीर झाला आहे. तसेच हे संकट अजूनही संपलेले नाही. अशावेळी निकाल लागताच नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे तयार असणे फार गरजेचे आहे.

*प्रवेश घेतांना लागणारी आवशक कागदपत्रे*
१.शाळा सोडलेचा दाखला
२.मागील वर्षाचे गुणपत्रक
३.जातीचा दाखला (आरक्षणाच्या लाभासाठी)
४.जात पडताळणी (आरक्षणाच्या लाभासाठी)
५.नॉनक्रिमिलेअर (फी माफीसाठी) 
६.डोमासाईल 
(महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे रहिवासाचा पुरावा)
७.डोंगरी दाखला 
(मेडिकल प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी)
८.उत्पन दाखला (फी माफीसाठी)
९.शेतकरी दाखला (B.Sc Agree प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी)
१०.अल्पभूधारक शेतकरी दाखला
(होस्टेलच्या फी माफीसाठी)
११. EWS प्रमाणपत्र (आरक्षणाच्या लाभासाठी) 



*-: जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.
  ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.
  क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा.
  (वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.)
६.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा.
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८.शिधापत्रिका
९.अर्जदार यांचा एक फोटो.

*-: नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचा जातीचा दाखला
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही महसुली पुरावा.
६.अर्जदार यांचे आधारकार्ड
७.शिधापत्रिका
८.अर्जदार यांचा एक फोटो.




*-: डोमासाईल साठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.

*-: उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.तलाठी उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.

*-: डोंगरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पुरावा 
६.७/१२,खातेउतारा अथवा घराचा उतारा.
७.अर्जदार यांचा एक फोटो.

योग्य वेळी योग्य तयारी असली तर भविष्यात होणारा आर्थिक व मानसिक त्रास तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा