google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: राष्ट्रगीताबद्दल माहिती

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

राष्ट्रगीताबद्दल माहिती

🎇 राष्ट्रगीताबद्दल माहिती 🎇

१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

२. २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

३. राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

४. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

५. जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये भारत विधाता या शीर्षकाखाली तत्व बोधिनी पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

६. १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून Morning song of India या नावाने छापले गेले.

७. राष्ट्रीय गीत (National Song . : बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

८. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

९. १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

१०. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.
--------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा