google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: इयत्ता -10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

इयत्ता -10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा

 *इयत्ता -10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा*


प्रति, मा.मुख्याध्यापक ,शिक्षक ,पालक व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार


      मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील (माध्यमिक शिक्षक ,आश्रमशाळा हातेड ता.चोपडा) इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा मार्च 2021 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास , विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी व विज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने *"इयत्ता - 10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा"* या online परीक्षेची सुरवात करीत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.


    🥇🎉*विज्ञान प्रश्नमंजुषा*🎊🥇



1. 10 गुणांची दर सोमवारी Online चाचणी परीक्षा आयोजित केली जाईल.व त्याची लिंक दर सोमवारी टाकली जाईल. 


2.  10 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एक गुणास एक प्रश्न असेल.


3. चाचणीची वेळ दर सोमवारी रात्री 8:30  ते 9:30 असेल. परीक्षा वेळेवर सुरू होईल व वेळेवर संपेल.


4. चाचणीचे वैयक्तिक गुण आपणास  लगेच पहावयास मिळतील.


5. चाचणीत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे दर मंगळवारी ग्रुप वर घोषित केले जातील. तसेच त्यांना आकर्षक प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. 


6. चाचणी ही 10 वी विज्ञान विषयाच्या पाठ्य पुस्तकावर आधारित असेल.


7. चाचणी ही विनामूल्य आहे.


8. चाचणीस ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी खालील whats app ग्रुप जॉईन करावा.


9. https://chat.whatsapp.com/L83yebkhfL59meog2qNJ2L


आपलाच

श्री.भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील 

अनु.आदिवासी.आश्रमशाळा , हातेड ता. चोपडा जि. जळगांव

ब्लॉग- https://bhupendrapatil35.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा